भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी  राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला.  

गिरीश महाजन जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. या मिरवणुकीमध्ये लेझीमच्या तालावर ठेका धरत मिरवणूकीत नाचत  असतात. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी आपली ही परंपरा खंडित केलेली नाही.

जामनेर शहरात जयभीम नगरातून निघालेल्या मिरवणुकीत निळा शर्ट परिधान करुन मोठ्या उत्साहात गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर ठेका धरला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थितांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.