आंबेगावात व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन मावस भाऊ-बहिणीची आत्महत्या

475

आंबेगाव, दि. १३ (पीसीबी) – एका विहिरीत उडी घेऊन मावस भाऊ-बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील पांढरी मंदिराच्या मागच्या घोडनदी काठी असलेल्या विहिरीतून समोर आली.

अक्षय अशोक जाधव (वय २४) आणि ऋतुजा उत्तजा तट्टू (वय १९) असे मृत भाऊ-बहिणीचे नावे आहेत.

मयत अक्षय आणि ऋतुजा हे दोघे नात्याने सख्खे मावस भाऊ-बहिण होते. दोघांनीही व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन घोडनदी काठी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आले. दोघांनीही प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.