आंध्र प्रदेशात दगडांच्या खाणीत भीषण विस्फोट, ११ मजूर ठार, ४ जखमी, बेपत्ता मजुरांचा शोध सुरू

94

आंध्रप्रदेश, दि. ४ (पीसीबी)  – आंध्र प्रदेशच्या कुरनूलमध्ये एका दगडांच्या खाणीत भीषण विस्फोट होऊन ११ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. यात ४ जण जखमीही झाले आहेत. या विस्फोटातील मृतांमध्ये खाणीत काम करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे.

अलुरू पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे.

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (SP) जे. गोपीनाथ यांच्या मते, या विस्फोटात मृतांमधील मजूर हे बिहार, ओडिशा आणि छत्तीसगडचे रहिवासी आहेत. हे मजूर खाणीत दगड फोडण्याचे आणि ते ट्रकमध्ये भरण्याचे काम करायचे.