आंध्र प्रदेशच्या गौतमी नदीमध्ये बोटपलटल्याने अनेकजण बेपत्ता

68

गोदावरी, दि. १५ (पीसीबी) – आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील गौतमी नदीमध्ये शनिवार दुपारी एक बोट पलटल्याने अनेकजण बेपत्ता झाले आहेत. या नावेत ४० पेक्षा अधिक लोक होते, अशी प्राथमिक माहिती आहे. यापैकी अधिकांश विद्यार्थी आहेत असे सांगितले जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाला धडक बसल्याने बोट पलटली अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरीकांच्या मदतीने प्रशासनाला जवळपास ३० जणांना वाचवण्यात यश आले असून दोन जणांचे मृतदेह सापडल्याचीही माहिती आहे. मात्र, अद्यापही अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. तालारीवारी पालेम येथून पासुवुल्लांकाच्या दिशेने हे नाव जात होती. दरम्यान पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.