संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी व दहशतवादी संघटनांची यादी आज बुधवारी जाहीर केली आहे. या यादीतील १३९ दहशतवादी हे एकट्या पाकिस्तानमधील असल्याने पाकची नाचक्की झाली असून या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर- ए- तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे असंख्य बनावट पासपोर्ट असून रावळपिंडी आणि कराचीतून हे पासपोर्ट जारी करण्याते आले होते. कराचीत दाऊदचा बंगला असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

यामध्ये अल- जवाहिरीचा नंबर पहिले लागला आहे. ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय असलेला अल- जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान- पाकिस्तान सीमेवर लपून बसल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईदचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय सईदच्या दहशतवादी संघटनेचाही या यादीत समावेश आहे.