अाता जनतेलाच विचारणार; माझं नेमकं काय चुकलं? अगतिक खडसेंची खंत

202

मुक्ताईनगर, दि. ३ (पीसीबी) –  ‘गेली ४० वर्षे भाजपची सेवा करीत आहे. असे काय झाले की एका दिवसात बदनाम करण्यात आले? अाता राज्याचा दौरा करून माझे काय चुकले? हे आता जनतेलाच विचारणार आहे’, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी व्यक्त केली. खडसेंच्या गावी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात हा संकल्प बोलून दाखवला.

चाळीस वर्षे माझ्याकडे कोणाची बोट दाखविण्याची हिंमत नव्हती, राजकारणातील बाप म्हणणारेच आता बाप बदलू लागलेले आहेत. माझ्यावरील आरोपात तथ्य आढळले नसताना शिक्षा का? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, खडसे यांच्यासाठी लवकरच आनंदाची घटना घडेल. योग्य वेळी त्यांना न्याय मिळेल, असे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.