अश्लील फोटो न पाठवल्याने कामगार महिलेची बदली; सीईओ विरोधात गुन्हा दाखल

363

वाकड, दि. १३ (पीसीबी) -शोरूमच्या सीईओने कामगार महिलेला नग्न फोटो पाठवण्यास सांगितले. महिलेने फोटो न पाठवल्याने सीईओने तिची दुस-या शाखेत बदली केली असल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 11 मे 2022 या कालावधीत मायकार शोरूम वाकड येथे घडला.

मयकार शोरूम वाकड येथील सीईओ एस ए पाटील असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित कामगार महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला नग्न फोटो पाठवण्याची वारंवार मागणी केली. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून महिलेने आरोपीच्या मागणीला विरोध केल्याने तिची बदली चाकण येथील शोरूममध्ये केली. त्याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी (दि. 11) महिला वाकड येथील शोरूममध्ये गेली असता त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्या तिथेच बेशुद्ध पडल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.