अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचची कोरोना टेस्ट पॉसिटीव्

33

विदेश , दि. २४(पीसीबी) – जागतिक अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सोमवारी टेनिसपटून जोकोविच आणि ग्रिगोर द्विमित्रोर हे दोघंही कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. नोवाक जोकोविच सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोवाकच्या पत्नीलाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिची हि कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. बेलग्रेडमध्ये नोवाकने करोना चाचणी केली होती. तेव्हा त्याचा आणि पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुलांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे

यासंदर्भात एक पत्रकही जारी करण्यात आलंय. त्यात नमूद केल्यानुसार, नुकत्यात आयोजित केलेल्या एका स्पर्धेत नोवाक सहभागी झाला होता . त्यादरम्यान त्याने सर्व काळजीही घेतली होती. तरीही काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर सर्वांची चाचणी केल्यानंतर नोवाकचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचं समजलं.

WhatsAppShare