अवैध गुटखा वाहतूक करणारा आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

1

पौड,दि.०२(पीसीबी) – पौड परिसरात येथे वाहनासह महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटक्याचा ३ लाख ६६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, पौड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी व स्टॉप असे संयुक्तपणे पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पुणे बाजूकडून पौड बाजूकडे एक मारुती ओमिणी पांढऱ्या रंगाची कार नंबर MH 12 HN 3028 ही भरधाव वेगात संशयितरित्या पोलिसांना मिळून आली पोलिसांनी कार थांबण्याचा प्रयत्न केला असता सदर कार चालकाने भरधाव वेगात पुढे घेऊन गेलेने पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता, कार पिरंगुट गावातील पंडित ज्वेलर्स समोर मिळून आली.

त्यावेळी कारची मेध्ये पोते फोडून पाहिले तेव्हा त्या पोत्यात विमल पानमसाला नावाचा सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सचे 8 पोती, व ओमणी कार असा एकूण किंमत रुपये ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला व कार चालक नामे रामलाल छौगाजी चौधरी,वय ४३, रा. पिरंगुट कॅम्प , काळुराम पवळे ,ता.मुळशी जिल्हा पुणे. यास ताबेत घेतला असून त्याच्यावर पौड पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील , उपविभागिय पो. अधिकारी श्रीमती सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ सहा. पोलीस निरीक्षक विनायक देवकर पोलीस उपनिरीक्षक धोंडगे सहा.फौजदार दत्ता जगताप , पो.हवा/५० राजेंद्र पुणेकर, पो. हवा नितीन रावते, पो .ना. सागर चंद्रशेखर,पो.ना चंद्रशेखर हगवणे, पो.कॉ भोईटे यांनी केली आहे.

WhatsAppShare