अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर प्रशिक्षकानेच केला बलात्कार

469

रेवाडी, दि. २६ (पीसीबी) – हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यामध्ये अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत गेली अडीच वर्ष प्रशिक्षक आपल्यावर बलात्कार करत असल्याचे म्हटले आहे. गुरुग्राम, रोहतक यांसारख्या ठिकाणी प्रशिक्षकाने विविध बहाणे करत आपल्यावर बलात्कार केल्याचे मुलीने म्हटले आहे.

मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पॉस्को कायद्यानुसार प्रशिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षकाने पीडित मुलीला घडलेल्या घटनेबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याला घाबरुन मुलीने याबद्दल कोणाकडे तक्रार केली नव्हती. अखेर प्रशिक्षकाकडून होत असलेला त्रास वाढत गेल्याने मुलीने आपल्या पालकांकडे याबद्दल तक्रार केली. रेवाडी पोलिस तपास करत आहेत.