अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल

272

चाकण, दि. ३० (पीसीबी) – १९ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मोबाईलवरून ओळख करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून तिच्याशी शारीरिक संबध प्रस्थापित करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय शांताराम टोपे (पती), शांताराम टोपे ( सासरा) , अलका शांताराम टोपे (सासू), केशव शांताराम टोपे (दिर) , वर्षा श्रीकांत जाधव, पप्पु पवळे, पती धनंजय यांचा चुलता आहे त्याच नाव माहिती नाही. हे सर्व रा.पत्रेवस्ती, वाकी बुद्रुक, ता.खेड, जि.पुणे असे या आरोपींची नावे आहेत. (अद्याप अटक नाही.)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय १९ वर्षे) पती धनंजय शांताराम टोपे याने पीडितीशी मोबाईलवर ओळख करून तिच्याशी जबरस्तीने लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून प्रापंचिक कारणावरून शिवीगाळ करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा शारीरिक मानसिक छळ केला आणि तिला भेटण्यासाठी आलेल्या बहिण आणि चुलत भाऊ त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटीही केली असे पिडीतीने पोलिसांना सांगितले, या प्रकरणी पिडीतीच्या तक्रारीनुसार पतीसह सासरकडच्यां विरोधात चाकण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सा. पोलिस शिंदे करीत आहे.