अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघडकीस

160

चिंचवडगाव, दि. १६ (पीसीबी) – एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार 15 एप्रिल 2021 रोजी बिजलीनगर चिंचवड येथे घडला आहे. याबाबत 16 जून 2021 रोजी पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य संभाजी हरेगावकर (वय 21, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. हरेगाव, पोस्ट अटाळा, ता. धर्माबाद, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकत्र हॉलमध्ये झोपले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र मुलगी आठ आठवड्याची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare