अल्पवयीन मुलीवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करणा-या तरुणाला अटक

57

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – घरात एकटी असलेल्या 13 वर्षीय मुलीवर एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार 12 जानेवारी 2022 रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत तसेच डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला.

शिवा किसन राठोड (वय 21, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. 15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार हा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.