अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार

284

भोसरी, दि.१० (पीसीबी) – अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अबरार बशीर शेख (वय २० वर्षे, रा.रेल्वेफाटका जवळ, बोपोडी.पुणे) असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. (आरोपीस अदयाप अटक नाही)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय १७ वर्षे ) यांच्या तक्रारीनुसार आरोपी अबरार बशीर शेख (वय २० वर्षे, रा.रेल्वेफाटका जवळ, बोपोडी.पुणे) याने २०१८ पासून ते आतापर्यंत पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर वेळोवेळी  लैंगिक अत्याचार केले असे पीडीतीने पोलिसांना सांगितले आणि फिर्यादी आडिच महिन्याची गर्भवती आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार भोसरी पोलिस स्टेशन मध्ये  गुन्हा नोंदविण्यात आला असून. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिखरे करीत आहे.