अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल

228
संग्रहित

निगडी, दि.२९ (पीसीबी) – १६ वर्षीय मुलीची छेड काढल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना दि २८ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास निगडी यमुनानगर  किडजी प्रायमरी स्कुल शाळेच्या गेटसमोर घडली.

अथर्व शिवाजी मोरे (वय १६वर्षे रा.देहूआळंदी रोड, पाटिल नगर, चिखली,पुणे) असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आई (वय ४१ वर्षे) यांची मुलगी (वय १६वर्षे) दि.२८ रोजी दुपारी निगडी यमुनानगर किडजीजी शाळेसमोरून जात असताना आरोपी कु. अथर्व शिवाजी मोरे हा मित्रांना ‘बघ तुझे सामान चालले आहे’ असे तिला उद्देशून बोलून  पिडीतीला धक्का मारून ‘तु मला खूप आवडतेस तु माझ्याशी मैत्री करशिल का?’ अस म्हणून तिची छेड काढली हे पिडीतेच्या भावाला कळल्यावर त्याने तु माझ्या बहिणीची छेड का काढतोस असा जाब विचारला असता आरोपीने हा ‘मी तुझ्या बहिणीनीला छेडतो तु काय करणार आहेस’ असे बोलून पीडीतीच्या भावालाही कंबरेच्या बेल्टने मारहाण करून शिवीगाळ केली. मुलाचा आवाज ऐकूण पिडीतीची आई भांडण सोडविण्यासाठी  तिथे गेली असता आईने ‘तु माझ्या मुलीची छेड का काढतोस आणि  तु माझ्या मुलाला का मारतोस’ असा जाब विचारला असता पिडितीच्या आईचा गळा पकडून काना खानी मारली असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले  याप्रकरणी फिर्यादी आई (वय ४१वर्षे) यांच्या तक्रारीनुसार या अल्पवयीन मुलाविरोधात निगडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सा. पोलिस निरीक्षक आरदवाड करीत आहे.