अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत दाम्पत्याला अटक

1269

मुंबई, दि. १० (पीसीबी) – अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका विकृत व्यावसाईक दाम्पत्याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान पत्नी समोरच पती अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला कामाला लावते म्हणून तिच्या १६ वर्षाच्या मैत्रिणीच्या आईने तिला २१ जुलैला त्या विकृत दाम्पत्याकडे नेले होते. यावेळी दाम्पत्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देखील तिच्या आईने पोलिसात केली होती. यामुळे अत्याचार करुन तिला सोडून देण्यात आले. पिडीत मुलगी घरी आली आणि सगळी हकीकत आईला सांगितली. यावर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी पिडीत १४ वर्षीय मुलीच्या मैत्रीणीची देखील चौकशी केली असता तिच्यावर देखील त्या दाम्पत्याने अत्याचार केल्याचे कबुल केले. तर तिच्या आईने तिला त्यांच्याकडे पाठवले  असल्याचे सांगितले.  यावर पोलिसांनी विकृत दाम्पत्यासह पिडीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईला देखील अटक केली आहे. ती मुलींना दाम्पत्याजवळ पाठवण्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये आकारत असल्याची माहिती समोर आले आहे.