अलिबागमध्ये स्वारगेटकडे निघालेल्या शिवशाही बसचा भीषण अपघात; एसटी बसलाच दिली धडक

91

अलिबाग, दि. २८ (पीसीबी) – अलिबागमधील कार्लेखिंड येथे ‘शिवशाही’ आणि एसटी बसच्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला.

राज्य परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ बस मुरुडवरुन स्वारगेटला जात होती. तर एसटी बस पनवेलवरुन अलिबागला येत होती. कार्लेखिंड येथे ओव्हरटेक करताना शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात १५ जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.