अरुण जेटलींची प्रकृती चिंताजणक

64

दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजणक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या त्यांच्या कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्ट द्यावा लागत आहे. याआधी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नऊ ऑगस्ट रोजी जेटलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.