अयोध्या वादावर आता पडदा पडलाय- नवाब मलिक

148

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून या निकालानंतर अयोध्या वादावर पडदा पडला आहे,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी निकालानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. मग राजकीय पक्ष असो किंवा धार्मिक संघटना, सर्वांनीच तो मान्य केला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती,’ असे मलिक म्हणाले. ‘कुठेही उत्सव साजरा केला जाऊ नये. कुणाच्या भावना दुखावल्या जावू नयेत’, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे. ‘यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांच्या माध्यमातून धर्माच्या नावाने पुन्हा वाद होणार नाही, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला असून अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, येत्या तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करून तिथे मंदिर उभारण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालावर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

WhatsAppShare