अमोल कोल्हेंसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरुन निघणार नाही – अमोल मिटकरी

157

पुणे, दि.१(पीसीबी) – अमोल कोल्हेंसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरुन निघणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे.

बोऱ्हाडे-शेरकर वादात राजकारण करु पाहणाऱ्या मंडळींना मिटकरी यांनी आपल्या निशाण्यावर घेतलं आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सहन कराव्या लागलेल्या मनस्तापावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. अखेर टोळधाड उघडी पडली. राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार, आमचे बंधू अतुलशेठ बेनके यांनी भक्तांची धारण चांगलीच पाचावर बसवली. विरोधकांनी एक कायम लक्षात ठेवावं इथे नमो भक्त नाहीत इथे राष्ट्रवादी आहे. तुम्ही कसेही चाल खेळलात तरी डाव जिंकणारे योद्धे इकडेच आहेत. शेवटी अख्या टोळधाडी वर अतुलशेठ यांनी फवारणी करून ट्रोल करणारे उघडे नागडे केलेत, असं ते म्हणाले.

दरम्यान एक खंत कायम मनात राहील ती म्हणजे या सर्व प्रकारात खासदार डॉ. अमोल कोल्हे सारख्या प्रामाणिक व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दात त्यांनी दुःख देखील व्यक्त केलं.

अखेर टोळधाड उघडी पडली. राष्ट्रवादीचे जुन्नर चे आमदार, आमचे बंधू अतुलशेठ बेनके यांनी भक्तांची धारण चांगलीच पाचावर…

Gepostet von Amol Mitkari am Sonntag, 31. Mai 2020

WhatsAppShare