अमेरिकेला हादरवून सोडणारा गोळीबार… गोळीबाराच्या घटनांनी सिनसिनाटी शहर हादरलं…

0
492

सिनसिनाटी,दि.१७ (पीसीबी) : काल अमेरिका गोळीबाराच्या घटनांनी हादरुन गेलं आहे. अमेरिकेतील ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहरात गोळीबाराची भीतीदायक घटना घडली. रविवारी शहारात अनेक ठिकाणी झालेल्या या गोळीबारात 18 जण जखमी झाले असून, त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तीन विविध ठिकाणी एक ते दिड तासांमध्ये गोळीबाराच्या या हादरवून सोडणाऱ्या तीन घटना घडल्या.

वॉलनट हिल्स भागात झालेल्या गोळीबारात ३ जण जखमी झाले. त्याशिवाय, एवॉन्डेल भागातही 4 जणांवर गोळीबार करण्यात आला. शिवाय ओवर-द-रिने भागात सुद्धा गोळीबाराची घटना घडली. या मध्ये 10 लोक जखमी झाले, तर त्या पैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 60 ते 90 मिनिटांमध्ये या तीनही घटना तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर घडल्या आहेत. परंतु,या तीनही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचं दिसत असून तीनही घटनांमागे वेगळी-वेगळी कारणं असण्याची शक्यता आहे. असं पोलिसांच म्हणणं आहे. या घडलेल्या घटना अमेरिकेला हादरवून सोडणाऱ्या ठरल्या आहेत.