अमेरिका चीनला धडा शिकविणार ?

0
373

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही आहे की, कोरोनीमुळे लाखभर निष्पाप लोकांचा बळी गेल्याने अमेरिका चीन चांगलाच धडा शिकविणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी अशा कायद्याची मागणी केली. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या चीनवर बंदी आणण्याच्या भूमिकेला बळ मिळू शकतं. संपत्ती गोठवणे, प्रवासावर बंदी तसंच चीनच्या कंपन्यांना अमेरिकच्या मार्केटमध्ये बंदी अशा पद्धतीने कारवाई होऊ शकते.

“कोरोनाच्या संकटासाठी चीन कारणीभूत आहे. कोरोना पसरवण्यात त्यांचा वाटा आहे. चीनने कोरोना संकटाविषयी जगाला सतर्क केलं नाही आणि म्हणूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग झाला”, असं खासदार जिम इन्होफ म्हणाले.

चीनवरील बंदीच्या प्रस्तावित कायद्याचं नाव ‘कोविड-19 अकाउंटिबिलिटी बिल’ असं आहे. प्रस्तावित कायद्यानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना 60 दिवसांच्या आत चीनने कोरोनासंदर्भात सगळी माहिती दिली आहे, असं सभागृहाला सांगावं लागेल. त्यानुसार संयुक्त राष्ट्र तसंच जागतिक आरोग्य संघटना चौकशी सुरू करू शकते. चीनने वेट मार्केट अर्थात पशुबाजार बंद केले आहेत असं स्पष्ट व्हायला हवं. हाँगकाँगमधील लोकशाही समर्थकांची सुटका करायला हवी. यापैकी काहीही सिद्ध होऊ शकलं नाही तर ट्रंप यांना चीनवर विविध स्वरुपाची बंदी घालण्याचा अधिकार प्राप्त होईल. संपत्ती गोठवणे, प्रवासावर बंदी तसंच चीनच्या कंपन्यांना अमेरिकच्या मार्केटमध्ये बंदी अशा पद्धतीने कारवाई होऊ शकते.