अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मराठा आरक्षणावर केली चर्चा; लवकरच दोघांमध्‍ये होणार बैठक

62

मुंबई, दि. ८ (पीसीबी) –  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून चर्चा केली. राज्यातील मराठा आरक्षणासाठी झालेले आंदोलन आणि त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांच्यात चर्चा झाली. तसेच राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी पाठिंबा देण्याबाबतही बोलणे झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबाबतही दोघांत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. लवकरच शहा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भेटणार असून लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.