अमित शहा-राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात २ दिवस मुक्काम

68

लखनऊ, दि. ४ (पीसीबी) – पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष व काँग्रेसने जागा वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. म्हणूनच भाजपाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवार व गुरुवारी उत्तर प्रदेशात तळ ठोकून असतील.

संत कबीरनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचा बिगुल वाजवल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुक्कामामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीचा शहा दौरा करतील. त्याचबराेबर मिर्झापूर, आग्रा येथील दौराही करतील. या भेटीतून ते लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधी आपला मतदारसंघ अमेठीत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतील.