अमित शहांनी बाहेरून गुंड आणून कोलकात्यात धुडगूस घातला – तृणमुल काँग्रेस

70

कोलकता, दि. १५ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा खोटारडे आहेत, त्यांनीच बाहेरून गुंड आणून कोलकात्यात धुडगूस घातला. विद्यापीठाच्या परिसरातील ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळ्याची तोडफोड केली, असा आरोप तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रेन यांनी केला आहे.

डेरेक म्हणाले की,  कोलकात्यात बाहेरील लोकांना आणण्याची काय गरज होती, असा प्रश्न करत कोणीही येऊन येथे धुडगूस घालतो? आम्ही कोलकत्यात राहतो, हे एक महानगर आहे. परंतु, हे बाहेरचे कोण आहेत? तेजिंदरसिंग बग्गा कोण आहे? त्याला अटक करण्यात आली होती? दिल्लीत एकजणाच्या कानशीलात लगावणारा हाच तो व्यक्ती आहे का? तुम्ही तुमच्या बाहेरील गुंडांमध्ये त्याला घेतले आहे, असेही डेरेक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोलकात्यात मंगळवारी  अमित शहांच्या  रोड शो दरम्यान झालेला हिंसाचार व ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीच्या घटनेनंतर भाजप व तृणमुल काँग्रेसकडून पुरावे सादर करून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.