अमित शहांनी घेतली रतन टाटांची भेट

192

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानातंर्गत आज (बुधवार) मुंबईत दाखल झाले आहेत. शहा यांनी सायंकाळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यासोबतची भेट रद्द करण्यात आली आहे.

अमित शहा यांनी साडेचारच्या सुमारास रतन टाटा यांची भेट घेतली. तसेच यावेळी मोदी सरकारने मागील ४ वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. सोबत त्याबाबतचे बुकलेट भेट दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार व्ही. सतिश आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रतन टाटा यांना शिवाजी महाराजांवरील एक पुस्तक भेट दिले. शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने फडणवीस यांनी टाटा यांना हे पुस्तक भेट दिले.