अमित शहांकडून माधुरी दिक्षितला राज्यसभा खासदारकीची ऑफर ?

237

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानातंर्गत आज (बुधवार) मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी आज दुपारी दीडच्या सुमारास शहा यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची भेट घेतली.

अमित शहा यांनी माधुरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ४ वर्षांतील कामांची माहिती देणारे बुकलेट भेट दिले. भाजपने माधुरी यांना राज्यसभेची ऑफर दिल्याचेही समजते. मात्र, भाजपने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अनिल जैन आदी नेते यावेळी उपस्थित होते.

‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानातंर्गत अमित शहा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दिक्षीत आदींचा समावेश आहे.