अमिताभ बच्चन यांचे दातृत्व; राज्यातील ३६० शेतकऱ्यांचे कर्ज फेडणार 

256

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्यातील ३६० शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियाना अंतर्गत ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पात्र असलेल्या राज्यातील ३६० शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी बच्चन यांनी २ कोटी ३ लाख रुपयांची मदत दिली आहे. यातील बहुतांश शेतकरी हे विदर्भ-मराठवाड्यातील आहेत.

त्याचबरोबर  राज्यातील ४४ शहीदांच्या कुटुंबातील ११२ सदस्यांना अमिताभ यांनी २.२ कोटी रुपयांची मदत दिली आहे. काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या मोसमाच्या लॉन्चिंग सोहळ्यात बच्चन यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

दरम्यान, याआधी बच्चन यांनी केरळमधील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. तर पोलिओ निवारण, स्वच्छ भारत,  बेटी बचाओ अशा सामाजिक उपक्रमांच्या जनजागृतीसाठी बच्चन यांनी पुढाकार घेतला आहे.