अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून अकरा वर्षीय मुलाला मारहाण मुलगा आठ दिवस कोमामध्ये

422
संग्रहित
आळंदी, दि.२१ (पीसीबी) – आळंदी येथील एका अध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या  अकरा वर्षीय मुलाला हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून  बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अध्यात्मिक शिक्षण संस्थेतील महाराजावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापी आरोपीला अटक केली नाही. 
भगवान महाराज पोव्हणे (रा.आळंदी, ता.खेड) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका खासगी रूग्णालयात साफसफाईचे काम करतात, त्यांनी त्यांचा मुलगा ओम राजू चौधरी (वय११ वर्षे) याला आळंदी येथील माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते मागील काही दिवसांपूर्वी आरोपी भगवान महाराज यांनी ओम याला हरीपाठ आणि अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून काठीने  छातीवर,पाठीवर, हातापायावर मारहाण करून ओमला गंभीर जखमी केले होते. त्यामध्ये ओम आठ दिवस कोमामध्ये गेला होता. याप्रकरणी फिर्यादिने महाराजांनी ओम याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दलची तक्रार नोंदवली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार महाराजांविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक चौधर करीत आहेत
WhatsAppShare