अभिनेत्री रिटा भादुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

89

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – ‘निमकी मुखिया’ या टीव्ही मालिकेत इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरील आई रिटा भादुरी यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६२ वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे पती अभिनेते शिशीर शर्मा आणि दोन मुले असा परिवार आहे.

रिटा भादुरी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची किडनी खराब झाली होती. त्यांना दर दोन दिवसाने डायलिसीससाठी रुग्णालयात जावं लागायचं. दोन आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती अभिनेते शिशीर शर्मा यांनी ट्विटरवरून रिटा भादुरी यांच्या निधनाची माहिती दिली.