अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं किडनीच्या आजाराने निधन

88

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं किडनीच्या आजाराने निधन झालं. ती २७ वर्षांची होती. शुक्रवारी रात्री तिचं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र तिची प्राणज्योत शुक्रवारी रात्री उशिरा मालवली. शनिवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२०१२ पासून मिष्टी मुखर्जीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. लाइफ की तो लग गयी हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ती काही सिनेमांमध्ये झळकली मात्र बिग बजेट सिनेमा तिला मिळाला नव्हता. २०१४ मध्ये मिष्टी मुखर्जीवर सेक्स रॅकेट चालवल्याचाही आरोप झाला होता त्यावेळी तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. तिच्या घरी धाड टाकण्यात आली त्यावेळी पोलिसांनी अनेक सीडीज आणि टेप्स सापडले होते. मिष्टी मुखर्जीच्या कुटुंबीयांवरही हे आरोप झाले होते.

WhatsAppShare