अभिनेत्री प्रीती झंगियानीच्या सात वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

296

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  सुपरहिट फिल्म ‘मोहब्बतें’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री प्रीती झंगियानीचा सात वर्षांचा मुलगा जयवीरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. प्रीती आणि तिचा पती प्रवीण डबास यांनी याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात आरिफ सिद्दीकी नावाच्या इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

प्रीतीने दिलेल्या माहितीनुसार, माझा मुलगा जयवीर खासस्थित शिवस्थान अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये त्याच्या काही मित्रांसोबत खेळत होता. तिथे दुसऱ्या बिल्डिंगमधील काही मुलेदेखील होते. सर्व फुटबॉल खेळत होते. खेळता खेळात या मुलांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. तेथे खेळणाऱ्या एका मुलाने माझ्या मुलाच्या पोटात जोरात मारले. त्यावर माझ्या मुलाने त्याला ‘मुर्ख’ म्हटले. यानंतर त्या मुलाने पुन्हा एकदा माझ्या मुलाला मारहाण केली. त्याने घरी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. त्यानंतर त्या मुलाचे आजोबा आरिफ सिद्दीकी पार्कमध्ये आले आणि त्यांनी कुणाचे काहीही न ऐकता माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. खार पोलिस अधिक तपास करत आहेत.