अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

1414

बुलडाणा, दि. ५ (पीसीबी) – बुलडाण्यात दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये नेहा पेंडसेला भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.  

एका  मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नेहा स्टेजवर चढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिला धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे  भांबावलेली    नेहाला संताप अनावर झाला.

यावेळी एका महिला पदाधिकाऱ्यांने नेहाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र,  नेहाने संतापून तिच्यासमोर हात जोडले आणि तेथून ती निघून गेली. या प्रकरणी नेहाने  आयोजकांवर संताप व्यक्त केला.