अभिनेत्री दीप्ती नवल यांना धमकीचा ई-मेल

145

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – अभिनेत्री दीप्ती नवल यांना एका ई-मेलद्वारे बिटकॉइनच्या स्वरुपात चार लाख रुपये खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २४ तासांच्या आत ३.९ लाख रुपये दे, अन्यथा तुझी इंटरनेट ब्राऊजिंग हिस्ट्री सार्वजनिक करू अशी धमकी या ई-मेलद्वारे देण्यात आली आहे.  

याप्रकरणी दीप्ती यांनी मुंबईतल्या वर्सोवा पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रॅश मेलमधील अशा धमकींच्या ई-मेलला काहीही अर्थ नाही, त्याकडे दुर्लक्ष करायला हवे, असे पोलिसांनी दीप्ती यांना सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर सेलच्या मदतीने हा ई- मेल कोणत्या सर्व्हरवरून पाठवला गेला याचा शोध पोलीस घेत आहेत. साइबर क्राइम एक्स्पर्ट रितेश भाटिया यांनाही २५ जूनला असाच एक ई-मेल आल्याचे सांगितले. त्यातही बिटकॉइनची मागणी केल्याचे समोर आले. मात्र रितेश भाटिया यांनी या ई-मेलकडे दुर्लक्ष केले. कारण हा मेल बनावट असल्याचे त्यांना माहित होते. गेल्या दोन आठवड्यात मला असे ई-मेल मिळालेल्या जवळपास २० लोकांचे फोन कॉल्स आल्याची माहिती रितेश भाटिया यांनी दिली आहे.