अभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार

134

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात आर्थीक फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील पाली हिलमध्ये विकत घेतलेल्या बंगल्याचे ब्रोकरेज न भरल्याचा आरोप दोघींविरोधात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सप्टेंबर २०१७ मध्ये कंगना आणि रंगोली यांनी वांद्र्यातील पाली हिल परिसरात २०.०७  कोटी रुपयांना बंगला विकत घेतला होता. मात्र या व्यवहारातील मध्यस्थाला संपूर्ण रक्कम (ब्रोकरेज) दिली नसल्याचा आरोप ब्रोकर प्रकाश रोहिरा यांनी केला असून खार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सर्वसाधारणपणे एक टक्के ब्रोकरेज दिला जात असल्यामुळे तितकी, म्हणजे २० लाख रुपयांची रक्कम कंगनाने भरल्याचे तिच्या टीमतर्फे सांगण्यात आले. मात्र आता तक्रारदारानेच ब्रोकरेज वाढवून २ टक्के, म्हणजे आणखी २० लाख मागितले आहेत. असा व्यवहार ठरलाच नव्हता, असा दावा कंगनाच्या वतीने करण्यात आला आहे.