अभिनेते मोहनलाल यांनी घेतली मोदींची भेट; भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण  

119

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – मल्ल्याळम् ‘सुपरस्टार’ अभिनेता मोहनलाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीमुळे मोहनलाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपला मोहनलाल यांचा फायदा होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. 

मोहनलाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजप त्यांना काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात तिरुवनंतपूरच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही मोहनलाल यांच्या भाजप प्रवेशाला समर्थन असल्याची  माहिती मिळत आहे.

दरम्यान, केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एका जागेवर विजय मिळाला आहे. तसेच मतांच्या टक्केवारीत सुधारणा झाली होती. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. राजशेखर यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा वारसदार म्हणूनही मोहनलाल यांच्याकडे पाहिले जात आहे.