अभिनेता सलमान खानवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

835

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या प्रोडक्सन कंपनी द्वारा निर्मित ‘लवरात्री’ या सिनेमामध्ये धार्मिक भावना दुखावल्या जाणारे चित्रीकरण असल्याने बिहारमधील मुजफ्फरपूर कोर्टाने  सलमान खानवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीचा नवा रोमँटिक सिनेमा ‘लवरात्री’ हा नवरात्री उत्सवाच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, सिनेमाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला. तसेच सुधीर ओझा यांनी कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे बिहारमधील मुजफ्फरपूर कोर्टाने सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर मिठनापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, लवस्टोरी या सिनेमात गुजरातमधील एक प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात आयुष शर्मा आणि वरीना हुसेन यांची प्रेमकहाणी बहरत जात असल्याचे या सिनेमात दाखवले आहे. हा सिनेमा  ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.