अभिनेता फरहान अख्तरचे मराठमोळ्या मॉडेल बरोबर शुभमंगल

103

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न बंधनात अडकले. त्यांच्यापाठोपाठ आता अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

फरहान आणि शिबानी गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत आहेत. करोनामुळे त्यांना लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, फरहान आणि शिबानी २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत रजिस्टर लग्न करणार आहेत. त्यानंतर काही मोजक्या लोकांसाठी ते रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी फरहान आणि शिबानी यांची भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरत होते. पण आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.