अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून अटक

593

लोणावळा, दि. १३ (पीसीबी) – बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहलीला आपल्या प्रेयसीला मारहाण केल्या प्रकरणी लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सांताक्रूझ पोलीसांनी केली आहे.

नीरु रंधावा असे अरमानच्या प्रेयसीचे नाव असून तीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या देवान- घेवानीतून अभिनेता अरमान आणि त्याची प्रेयसी नीरु रंधावा यांच्यात रविवारी वाद झाला होता. यावर अरमान याने नीरुला जबर मारहाण केली होती. यात तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. यावर नीरु हीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासून अरमान फरार होता. यानंतर मंगळवारी  सांताक्रूझ पोलीसांनी अरमान याला लोणावळ्यातून अटक केली. सांताक्रूझ पोलीस तपास करत आहेत.