अभिनेता अभिषेक बच्चन आता युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी

77

बिहार, दि.२३ (पीसीबी) : महाराष्ट्रासह देशात कार्यरत असलेल्या युवक बिरादरीच्या अध्यक्षपदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हे पदाधिकारी 2026 पर्यंत कार्यरत राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याची घोषणा करण्यात आली. आर्थिक साक्षरता आणि पिकलबॉल खेळाचे प्रसारक सुनील वालावलकर यांची संस्थेचे कार्यकारी महासंचालक, कार्याध्यक्षपदी श्रीरंग सारडा, सचिवपदी विकास निकुंभ, तर कार्यक्रम प्रमुख म्हणून प्रदीप नाईक, पंकज इंगोले, कांचन कांकरिया, रेखा राठी यांच्यासह आशुतोष शिर्पे, स्वर क्रांती, अॅड. संज्योत वढावकर, लीना शेटे, देवेंद्र सिंह, निहार देवरुखकर, गौरव इंगळे आणि सईद झकेरिया यांची निवड करण्यात आली आहे.

WhatsAppShare