अभिनेता अक्षय कुमारने दिली प्रधानमंत्री सहायता निधीसाठी २५ कोटी रुपयांची मदत

126

 

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – देशातील कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तुमची आर्थिक मदत करण्याची इच्चा असल्यास PM-CARES या फंडात जमा करा , असे आवाहन करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.

त्यांच्या या ट्विटला प्रतिसाद देत अभिनेता अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहाँ है, असे ट्विट त्याने केले आहे. पंतप्रधान मोदींनीही त्याच कौतुक केले आहे.

 

WhatsAppShare