अबू सालेम याचा पॅरोलचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

115

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अबू सालेमने ४५ दिवसांची सुट्टी मागितली होती. विशेष म्हणजे हा पॅरोल त्याने मुंब्राची रहिवासी असणाऱ्या कौसर बहार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागितला होता. अबू सालेमच्या अर्जावर आज (मंगळवार) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.

अबू सालेम सध्या तळोजा कारागृहात असून याआधीही देखील त्याचे अनेक पॅरोलसाठीचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अबू सालेमने अर्जात न्यायालयाच्या निर्णयांनाही आव्हान दिले होते. मुख्य न्यायाधीश विजय कापसे तहिलरमानी आणि महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.