अबब ! तीन हजार फूट उंचीवर त्याने प्रेयसीला केले प्रपोज

210

न्यूयॉर्क, दि. १२ (पीसीबी) – प्रपोज करण्यासाठी कोणी काही शक्कल लढवेल सांगता येत नाही. गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचं तूम्ही चित्रपटात पाहिले असेलच. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही प्रियकर-प्रेयसी आपले प्रेम एका खास अंदाजात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून आयुष्यभर आपली प्रेमकथा आठवणीत रहावी, हा प्रयत्न त्यामागील असतो. अशीच हटके प्रेमकथा समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाने तब्बल तीन हजार फूट उंचीवर प्रेयसीला प्रपोज केले आहे. त्यांची ही कथा वाचून तुम्हाला नक्कीच आर्श्चय वाटेल.

नॉर्वेतील ३३ वर्षीय क्रिश्चियन रिचर्ड्स या व्यक्तीने जमिनीपासून तीन हजार फूट उंचीवर दोन मोठ्या खडकांच्या मधोमध जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज केले आहे. खडकाच्या आजूबाजूला पाणीच पाणी आहे. तसेच दोन्ही खडक एका भल्यामोठ्या दगडाने जाडले गेले आहेत. त्या दगडावर उभे राहून रिचर्ड्सने प्रेयसीला प्रपोज केले. इतका रोमँटिक प्रपोजल पाहून प्रेयसीची काय प्रतिक्रिया असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल. रिचर्ड्सची प्रेयसी बेक्स मोर्ले हिने हे रोमँटिक प्रपोजल तात्काळ स्वीकारले. नयनरम्य स्थळ आणि रिचर्ड्सचे प्रेम पाहून बेक्स भावनिक झाली होती.

हे खूप भितीदायक होतो, माझ्यापेक्षा बेक्सला अधिक चिंता होती. माझा पाय घसरून मी पडेल याची भिती बेक्सला सतावत होती. ट्रेकिंगला गेल्यानंतर माझ्या डोक्यात ही आयडिया आल्याचेही रिचर्ड्सने सांगितले.