अबब… आतापर्यंत 23 देशांमध्ये पोहचला ओमिक्रॉन

119

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – कोविडच्या ओमायक्रॉन व्हेरियंटविषयीची ताजी माहिती हाती आली आहे. “जोखीम असलेल्या” देशांमधून काल मध्यरात्री ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत भारतात एकूण 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणे विविध विमानतळांवर उतरली आहेत. यामध्ये एकूण 3,476 प्रवासी होते. सर्व प्रवाशांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 6 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. बाधित रुग्णांचे नमुने जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले आहेत, ज्याद्वारे त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की हे समजेल.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी सांगितले की, आतापर्यंत किमान 23 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये 6 WHO क्षेत्रांतील 5 देशांचा समावेश आहे. हा प्रसार आणखी वाढण्याची शक्याता आहे, ते म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भारतानेही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्रवाशांचा सर्व प्रवास इतिहास तपासला जात आहे.