…अन् लालूप्रसादांचे पुत्र तेजप्रताप शिवरूपात अवतरले

100

पाटणा, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा लहान मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव आज (मंगळवार) शिवरुपात अवतरले. उत्तर भारतात श्रावण महिना सुरु झाल्याने शिव पूजेसाठी मंदिरे भाविकांनी गजबजली आहेत. बिहारमधील पाटण्यात पूजेसाठी तेजप्रताप यादव थेट शिवरुपातच अवतरले.

शंकराप्रमाणे कमरेवर वाघाच्या कातडीचे कापड, गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ आणि डमरु घेऊन तेजप्रताप शिवभक्त आणि कार्यकर्त्यांसह मंदिरात दाखल झाले. तिथे त्यांनी शंखही वाजवला. मंदिरातील पूजेनंतर ते बाबाधामला रवाना झाले.

बिहार-झारखंडमधील अनेक भक्त देवघरच्या बाबा वैद्यनाथ धामला जाऊन शंकरावर जलाभिषेक करतात. तेजप्रताप कावड घेऊन सुल्तानगंजहून १२० किमी पायी देवघर जातील. तेजप्रताप पहिल्यांदाच त्यांच्या या रूपात अवतरलेले नाहीत. तर  यापूर्वी त्यांनी श्रीकृष्णाचे रुप धारण केले होते.