अनैतिक संबंधात अडथळा; नांदेडमध्ये पतीने केली मुख्याध्यापक पत्नीची हत्या

963

नांदेड, दि. २५ (पीसीबी) – नांदेडमधील मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने सुरेखा राठोड यांची हत्या त्यांच्याच पतीने हत्या केली असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती विजय राठोडला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड यांची गुरुवारी सकाळी हत्या करण्यात आली होती. तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता सुरेखा यांचे पती विजय राठोड याच्यावर पोलिसांना संशय आला. विजय राठोड हा देखील शिक्षक असून त्याचे एका राजकीय पक्षातील महिला पदाधिकाऱ्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात सुरेखा या अडथळा ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी विजयला ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पती विजय राठोडसह दीर अशोक टोपा राठोड, प्रमोद ऊर्फ अजय थोरात यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस तपास करत आहेत.