अध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन

24

पुणे, दि. १२ (पीसीबी) – प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आज सकाळी पुण्यात दादा वासवानी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. सिंधी समाजाचे धार्मिक गुरू म्हणून दादा वासवानी यांची ओळख होती. २ ऑगस्ट १९१८ रोजी हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार करतानाच प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही मोठे काम केले होते. त्यांनी अध्यात्मावर एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केले होते.