अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या: अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल – मराठा क्रांती मोर्चा

0
418

सांगली, दि. १८ (पीसीबी) – पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल, मुके मोर्चे बोलके होतील, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला.

सांगलीत काल पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा इशारा देण्यात आला. यावेळी आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय भीमा कोरेगाव दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.