अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

90

लखनऊ, दि. ६ (पीसीबी) – ‘अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले आहे,’ असे म्हणून भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी अधिकाऱ्यांची तुलना वेश्यांबरोबर केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे.

सुरेंद्र सिंह हे बैरिया मतदारसंघाचे भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. ‘अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले असते. त्या पैसे घेऊन आपले काम तरी करतात. स्टेजवर नाचतात. मात्र, हे अधिकारी पैसे घेऊन काम करतील की नाही याची काही शाश्वती नसते,’ असे सिंह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वीही सिंह यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. लोकसभा निवडणुकीत दोन संस्कृतींमध्ये युद्ध होईल. हे धर्म युद्ध असेल. हे कौरव-पांडवांमधलं युद्ध असेल. या आधुनिक पांडवाच्या दलाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करतील. तर कौरवांचे नेतृत्व मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव करतील. मात्र विजय मोदींचाच होईल,’ असे ते म्हणाले होते.