अतिक्रमण विभागात तक्रार केली आहे का, म्हणत दोघांना मारहाण

147

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – अतिक्रमण विभागाकडे तक्रार केयी आहे का, असे म्हणत पाच जणांनी मिळून हॉटेल व्यावसायिक दोन भावांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी सव्वापाच वाजता भोसरी भाजी मंडई व्यापारी संकुल येथे घडली.

ईश्वर भगवान बो-हाडे (वय 42, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण गजानन फुगे, मनोज अशोक परदेशी, भानुदास बबन लांडगे, महेश बबन लांडगे, गजानन काळुराम फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात अनाधिकाराने प्रवेश केला. ‘तुम्हाला लै माज आला आहे. तुम्ही आमची तक्रार अतिक्रमण विभागात केली आहे का’ असे म्हणत किरण फुगे याने लाकडी दांडके घेऊन फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत दुकानातील काउंटर ढकलून देऊन खाद्य पदार्थांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.